Farmer Id Card

Farmer Id Card : केंद्र शासनाकडून मिळणार आता शेतकरी ओळखपत्र.

FARMER ID CARD: सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार ने नवीन योजना काढली आहे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी ओळखपत्र मिळणार.

Farmer id card
Farmer id card

 

Farmer Id Card आहे तरी कसे?

Farmer Id Card हे तुम्हाला Agristack या संकेत स्थळ वरती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. आणि हे फार्मर आयडी  कार्ड हे आधार कार्ड सारखे कार्ड तुम्हाला मिळणार आहे. त्या कार्ड मध्ये तुमचा सर्व डाटा असणार आहे. ते असेल तरच तुम्हाला शेतीविषयक सुविधा मिळणार आहेत. सर्व सरकारी योजनेचे फायदे पात्र शेतकऱ्यांना सहज मिळू शकणार आहेत.

Farmer Id Card चे फायदे

ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र आहे अश्या शेतकऱ्यांनाच प्रधानमंत्री किसान निधी योजचेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000रु एवढे पैसे दिले जातात. जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला या Pradhanmantri Samman Nidhi Yojana चे लाभ मिळणे शक्य होणार नाही.

शेतकऱ्यांसाठी खास सूचना

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र  काढायचे असेल तर तुमच्या आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, जर तुमचा Adhar Card ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर फार्मर आयडि कार्ड निघणार नाही. त्यामुळे मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करून घ्या.

Farmer Id Card साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?

तर तुम्हाला शेतकरीओळखपत्रा साठी अर्ज  हा तुमच्या मोबाईल मधून करता येणार नाही हे लक्ष्यात असू द्या. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC Centar आणि आपले सेवा केंद्र ला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुमचं शेतकरी ओळख पत्राची नोंदणी केली जाईल.

तुम्हाला जर या विषयी ची अधिक माहिती साठी यामध्ये किती अर्ज सबमिट झाले आहेत. तुमच्या तालुक्यात किती अर्ज जमा झाले या विषयीची सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून जाणून घेऊ शकता.

https://mhfr.agristack.gov.in

शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी कोणती कागतपत्रे लागतात?

• सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड

• सातबारा उतारा

• जमीन मालकी हक्काचे

Conclusion

शेतकरी बांधवांनो farmer id card विषयक दिलेली माहिती आवडली असल्यास हा लेख शेअर करायला विसरू नका. तुमच्या मुळे अनेकांना याचा फायदा होऊ शकतो.

Leave a Comment