Namo Shetkari Installment Now शेतकऱ्यांना मिळणार 15000रुपये

Namo Shetkari Installment:सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणी आनंदाची बातमी मिळणार आता वर्षाला 15000 रुपये.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 15000 रुपये मिळणार कसे तर शेतकरी बांधवानो तर ते 15000रुपये कसे मिळणार आहेत ते जाऊन घेणार आहोत namo shetkri installment update या लेखामधून.

Namo Shetkari Installment
Namo Shetkari Installment

Namo Shetkari Installment योजनेत वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्त्याचे वितरण झाले आहे. तसेच या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आणी याचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. हा कार्यक्रम वनामती मधील कै.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात घेण्यात आला होता.

या ठिकाणी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी मदत मिळाली. पी एम किसान सन्मान निधीतून वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6000रुपये दिले जातात. तर याच्या अनुसरूनच नमो किसान सन्मान निधी ही राज्य शासनाची असणारी योजना वर्षाकाठी 6000रुपये शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून देते.

राज्य शासनाचे 6000 आणि केंद्र शासनाचे 6000 असे मिळून शेतकऱ्याला वर्षांमधून 12000 रुपये एवढी मदत मिळते.

परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या निधीत 3000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाचे 6000 आणि राज्य शासनाचे 9000 असे मिळून 15000 रुपये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून मिळणार आहे.

Leave a Comment