Pashu Savardhan Yojana 2025 पहा सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग मार्फत Pashu savardhan Yojana 2025 यामधून नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्जदार नोंदणी चालू करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील नागरिकांना मोफत शेळी मेंढी तसेच गाय म्हैस आणि कोंबडी वाटप केले जाते.आज आपण या लेखामध्ये Pashu savardhan Yojana 2025 या नावीन्यपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत.
अर्ज करण्याची तारिख अर्जाची अंतिम तारीख तसेच आवश्यक कागदपत्रे अर्ज कशा करायचा ही सर्व माहिती पाहणार आहोत.

pashu savardhan yojana 2025

पशु संवर्धन योजना 2025

तर मित्रांनो तुम्ही आणखीन या. योजनेचा लाभ घेतला नसेल तर या pashu savardhan yojana 2025 ची सर्व माहितीं वाचून लवकरात लवकर अर्ज करा आणी या योजनेच लाभ घ्या.
महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा राज्यामध्ये या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये योजना चालू केली आहे. यामध्ये तुम्हाला शेळी व मेंढी वाटप, गाय व म्हैस वाटप, कुकूटपालन अशा सर्व गोष्टी यामध्ये मिळतात.

अर्ज करण्याची तारीख किती?

पशुसवर्धन नावीन्यपूर्ण योजना या साठी अर्ज करण्याची तारीख 3 मे 2025 पासून सुरु झालेले आहे. या दिवसापासुन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 2 जून 2025 आहे या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अंतिम तारीख ही थोडी फार वाढूही शकते. परंतु 2 जून च्या अगोदर आपला अर्ज सबमिट करून घ्या.

अर्ज कसा व कुठे करावा?

•अर्ज करण्यासाठी तुम्हाला ah.mahabms.com हि वेबसाईट तुमच्या मोबाईल असेल किंवा लॅपटॉप याच्या वरती ओपन करा.
• सर्व प्रथम अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला अर्ज नोंदणी करून घ्यायची आहे.
• तिथे तुम्हाला सर्व पर्याय दिसतील अर्जदार नोंदणी वरती क्लिक करा.
• महत्वाच्या बाबींची लिस्ट तुमच्या समोर येईल तीं सर्व व्यवस्थित वाचून घ्या.
• अर्जदार नोंदणी करण्यासाठी जी माहिती विचारली आहे तीं सर्व बरोबर द्या. तुमची अर्जदार नोंदणी करून घ्या.

अर्जदार नोंदणी साठी कागदपत्रे

अर्जदार नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्व विचारलेली माहिती फक्त टाकायची आहे अपलोड करायची नाही.
•रेशन कार्ड क्रमांक
•बँक अकाउंट माहिती
याठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आणी तुमची सही अपलोड करावा लागणार आहे.
फोटो हा 80kb पर्यंत साईझ पाहिजे त्यापेक्षा जास्त चालणार नाही. सही ची साईझ हि 40kb पेक्षा जास्त चालणार नाही.
*अशी असणारी सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे.
त्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड तयार करून घ्या.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अर्जदार नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे.
आधार क्रमांक आणी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तीं योजना निवडून अर्ज पूर्ण भरा.
आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• जमिनी मालकीचे पुरावे ( सातबारा आणी 8-अ उतारा )
• जातींचे प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )
• उत्पन्न प्राणपत्र ( आवश्यक असल्यास )
इतर कागदपत्रे हि योजनेनुसार तुम्हांला द्यावी लागणार म्हणजेच तुम्हांला प्रत्येक योजनेला वेगळा वेगळी कागदपत्रे लागतात.

Leave a Comment