Farmer id card india काढलाय पण हा 1 प्रॉब्लेम येतोय का

केंद्र सरकारने भारतामध्ये  सर्व शेतकऱ्यांना Farmer Id Card India हा अनिवार्य  केला आहे. म्हणजे कुठल्याही योजनेचा लाभ घायचा असेल किंवा तसेचं शेतीचे कुठलेही काम असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडि असणे अनिवार्य आहे. तुम्ही जर आणखीन नोंदणी केली नसेल तर करून घ्या.आतापर्यंत बरेच शेतकऱ्यांनी Farmer ID Card India साठी नोंदणी केली आहे.

Farmer id card india

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केली आहे त्यांनाच सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सर्व शेतकरी फार्मर आयडी कार्ड नोंदणीसाठी सीएससी केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र या दुकानांमध्ये गर्दी करताना तुम्हाला पाहायला मिळत असतील.महाडीबीटी किंवा इतर कोणत्याही योजना  मध्ये लॉगिन करत असताना तुम्हाला फार्मेर आयडी टाकूनही समस्या येत आहे का.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार्मर आयडी कार्ड ची नोंदणी होणे आणि फार्मर आयडी कार्ड पूर्ण तयार होणे यामध्ये बराच फरक आहे. तुमची फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी होऊन तुम्हाला सेंट्रल आयडी नावाचा एक फार्मर आयडी मिळतो. त्यानंतर ही आणखीन एक प्रक्रिया बाकी राहते ती म्हणजे अर्ज अप्रूव्ह होणे.त्यामुळे तुमची नोंदणी जरी झाली असली तरी तुम्हाला farmer id card  वापरता येत नसल्याची समस्या पाहायला मिळत असेल.

Farmer id card india माहिती अशी पहा.

जर तुम्हाला हे अडचण येत असेल तर तुम्ही ॲग्री स्टॅग या वेबसाईटवरून तुमची माहिती तपासून घेऊ शकता. माहिती कशी तपासायची त्याची पूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे ती तुम्ही सविस्तर वाचून तुमची फार्मर आयडी कार्ड ची नोंदणी तपासू शकता.

•सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हांला Agristack या वेबसाईट ला तुमच्याकडे मोबाईल,लॅपटॉप जे असेल त्यावरती ओपन करून घ्या.    वेबसाईट लिंक -: येथे क्लिक करा.

• वेबसाईट ओपन केल्यानंतर  वरती तीन पर्याय दिसून येतील त्यामध्ये Dashboard,Check Enrollment Status,Login with CSC  असे दिसतील.

farmer id card

• त्यामधील Check Enrollment Status वरती क्लिक करा.

• तुम्ही या ठिकाणी तुमचा Enrollment ID किंवा आधार नंबर टाकून check करू शकता.

• आधार नंबर टाकून check वरती क्लिक करा.

farmer id card india

त्यानंतर तुमच्या समोर सम्पूर्ण माहिती दिसेल. इथे तुम्हाला central id,farmer name अशी बरीच माहिती दिसेल.

Farmer id card

Conclusion 

मी आशा करतो की farmer id card india  याची माहिती जाणून घेतली असेल , हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा.

Leave a Comment