तुम्हाला घरबसल्या तुमच्या शेताचा bhunakasha काढायचा आहे का मग जाणून घ्या कसा काढायचा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेजारी कोण कोणते गट आहेत हे माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या शेताचा नकाशा काडून जाणून घेऊ शकता. तसेच तुम्हाला शेतातील रस्ते माहिती करून घेण्या साठी पूर्ण गावातील नकाशा काढू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल मधून नकाशा कसा काढायचा ते पाहणार आहोत.
Bhunakasha Maharashtra Online (भू नकाशा महाराष्ट्र)
जमिनीचा किंवा शेताचा भू-नकशा मोबाईल वरून काढता येतो. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तेही 2 मिनिटांमध्ये मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता. नकाशा काढण्यासाठी शासनाची वेबसाईट उपलब्ध आहे. वेबसाईट वरून महाराष्ट्रातील कुठल्याही गावाचा नकाशा तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता आणी डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र सरकारने शेतीच्या जवळ जवळ सर्वच सेवा या ऑनलाईन केल्या आहे.उदा. शेतजमिनी चा फेरफार उतारा/भूमी अभिलेख फेरफार, जुने फेरफार, जुने सातबारा, चालू फेरफार, आपली चावडी, फेरफार डाउनलोड, मालमत्ता पत्रक पाहणे, ई-नकाशा/भू नकाशा, ई-मोजणी, ई-पिक पाहणी, ई -चावडी ,जमीन महसूल भरणा, फेरफार स्थिती इत्यादी.
या सर्व सेवा तुम्ही मोबाईल मधून घेऊ शकता. आज आपण याधील शेतजमीन चा नकाशा कसा काढायचा ते पाहणार आहोत.
Mahabhunakasha कसा काढायचा जाणून घेऊ
•भू नकाशा काढण्यासाठी तुम्हाला bhunakasha या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
• वेबसाईट ला ओपन केल्यानंतर डाव्या कोपऱ्यातील तीन आडव्या लाईन दिसतील त्यावरती क्लिक करा.
• आता याठिकाणी तुम्हाला ज्या गावाचा नकाशा पाहिजे त्या गावाचे लोकेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे.
• तुम्ही राज्य,जिल्हा,तालुका,गाव हे सर्व निवड्यानंतर खाली तुम्हाला त्या गावातील सर्व प्लॉट नंबर दिसतील तेथून जो हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता किंवा वरती तुम्ही जो पाहिजे तो टाईप करून टाकू शकता.
• त्यानंतर तुमच्या समोर त्या प्लॉट ची माहिती येईल आणी खाली map report असे दिसेल त्या वरती क्लिक केल्यानंतर pdf मध्ये तो नकाशा तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.
• तुम्हांला ऑनलाईन च पूर्ण नकाशा पाहायचा असेल तर उजव्या कोपऱ्या मध्ये एक बाण दिसेल त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण नकाशा येईल. तुम्ही तुम्हाला हवा तसा तो पाहू शकता.
Conclusion
तर शेतकरी मित्रांनो तुम्हांला Bhunakasha Maharashtra Online कसा काढायचा हा लेख पूर्ण वाचला असेल आणी तुम्ही तुमच्या शेताचा किंवा गावाचा नकाशा काढला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्रांना ही शेअर करा जेणे करून बाकीचे ही नकाशा काढायचे शिकतील. धन्यवाद….