Digital 7/12 Best Utara kasa kadaycha

तुम्ही घरबसल्या काढू शकता Digital 7/12 तोही फक्त 15 रुपयांमध्ये.

Digital 7/12 Utara : तुम्ही शेतकरी आहात का नाही याचा पुरावा आहे का असं कोणी विचारलं तर तुम्ही त्याना पुरावा म्हणून काय देणार तर सगळ्यांचे उत्तर एकच असेल सातबारा.सातबाराच कारण त्या वरती आपल्या शेतीची माहिती असते. तर अगोदर सातबारा काढण्यासाठी तलाठी यांच्याकडे जावे लागत होते. परंतु आता सर्व शेतकरी आपल्या शेतीचा Digital  Utara हा ऑनलाइन पद्धतीने काढू शकता.

Digital 7/12
Digital 7/12

तुम्हाला माहिती असेलच शासनाने 1 ऑगस्ट 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने Digital utara काढण्यासाठी उपलब्ध केला आहे. या दिवसापासूनच सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी असा असणारा सातबारा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा तलाठी कडे आपला सातबारा काढण्यासाठी जाण्याची गरज राहिलेली नाही.तर जाणून घेऊया डिजिटल सातबारा कशाप्रकारे काढता येतो.

Digital 7/12 कसा काढायचा?

डिजिटल स्वाक्षरी असणारा सातबारा काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या शासनाच्या वेबसाईटला ओपन करायचं आहे.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/

या वेबसाईट वरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करावे लागेल. तुम्हाला या ठिकाणी Otp Based Login आणि Regular Login अशाप्रकारे दोन ऑप्शन दिसून येतील. यामधील तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचा आयडी ओपन करू शकता.

यामधीलच सोपी पद्धत म्हणजे Otp Based Login म्हणजेच तुम्ही तुमचा मोबाईल टाकला की तुम्हाला एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही Digital Utara काढू शकता.

वरती तुम्हाला आठ ऑप्शन दिसून येतील. यामध्ये तुम्हाला Digitally Signed 7/12,Digitally Signed 8A,Digitally Signed Eferfar,Digitally Signed Property Card,Digitally Signed Erecord, Recharge Amount, Payment History,Payment Status. अशाप्रकारे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसून येतील.

Digital 7/12
Digital 7/12

सर्वात महत्त्वाचे म्हणजे digital 7/12 काढण्यासाठी प्रति सातबारा 15 रुपये चार्ज लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला Recharge Amount वरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे. तुम्ही Payment बँकेद्वारे,क्रेडिट कार्डद्वारे,डेबिट कार्ड द्वारे,यूपीआय द्वारे करू शकता. पेमेंट केल्यानंतर Digitally Signed 7/12 वरती क्लिक करून घ्या.

• तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि तसेच तुमचं गावाचे निवडून घ्यायचा आहे.

Digital 7/12
Digital 7/12

• वरती जिल्हा गाव तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.

• टाकून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली तुम्ही पेमेंट केलं असेल तर किती रुपयाचा रिचार्ज केलेला आहे त्याचं पूर्ण तुमचे पैसे या ठिकाणी दिसून येतील.

• वरती ओके करून घेतल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड च ऑप्शन दिसून येईल.

• अशाप्रकारे तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईल वरतूनच काढू शकता.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर digital 8A काढायचा असेल तर या ठिकाणी Digitally Signed 8Aवरती क्लिक करून तुम्ही काढू शकता.

तुम्हाला Digital Satbara आणि Digital 8A काढण्यासाठी चार्ज सारखाच असणार आहे. आणि तो 15 रुपये असणार आहे.

Digital 7/12 Utara याचा उपयोग कसा होतो?

सातबारा उतारा हा शेतीची विक्री किंवा खरेदी करताना उपयोग येतो. तसेच अनेकदा शासकीय योजनांसाठीही तुम्हाला सातबारा उताऱ्याची गरज लागते. तुम्हाला विमा भरताना किंवा आणखी बऱ्याच कामांसाठीही सातबारा उतारा लागतो.

Digital 7/12 कुठे वापरू शकतो?

 तर शेतकरी मित्रांनो तुम्ही Digital 7/12 utara हा कुठेही वापरू शकता. कुठेही म्हणजे तुम्ही शासकीय काम असो किंवा खाजगी काम असो तुमच्या कुठल्याही कामासाठी हा डिजिटल सातबारा चालणार आहे. त्याच्यावरती डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे तुम्हाला कोणाच्या स्वाक्षरीची गरजही नसणार आहे.

Conclusion

शेतकरी मित्रांनो Digital 7/12 हा लेख वाचला असेल आणि जर तुम्ही तुमच्या कामासाठी डिजिटल सातबारा काढला असेल कमेंट करून नक्की सांगा काही अडचण आल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्व मित्रांना आपला हा लेख शेअर करायला विसरू नका.

FAQS

1)डिजिटल सातबारा फ्री मध्ये डाउनलोड करता येतो का?

उत्तर. डिजिटल सातबारा फ्री मध्ये डाऊनलोड करता येत नाही त्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये चार्ज लागतो.

2)Digital सातबारा आपण कोणत्या वेबसाईट वरून काढू शकतो?

उत्तर. आपण डिजिटल सातबारा हा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावरून काढता येतो.

3)डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी मला कोणती माहिती द्यावी लागेल?

उत्तर. डिजिटल सातबारा काढण्यासाठी सर्वे नंबर किंवा तुमचे पूर्ण नाव देऊन तुम्ही डिजिटल सातबारा काढू शकता.

Leave a Comment