नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी वेबसाईटवर ज्याचे नाव आहे मराठी सोल्युशन.हवामानातील झालेल्या बदलामुळे शेतीचे बरेच नुकसानं होते आणि तेच नुकसान झालेले तुम्हाला भरपाई मनून विमा अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही रक्कम दिली जाते. त्यामुळं तुम्हांला अर्थिक मदत ही होते.
त्यामुळेच सरकारने फालबाग विमा योजना मृग बहार 2025 यासाठी अर्ज प्रकिया सुरु करण्यात आली आहे. तर मित्रांनो या विषयची सर्व माहिती या लेखा मध्ये दिली आहे त्यामुळे सम्पूर्ण लेख वाचा.
फळपीक विमा योजना अर्ज नोंदणी कुठे करावा?
फळपीक विमा योजना मृग बहार 2025 अर्ज तुम्ही csc centar तसेच आपले सरकार केंद्र हिथेही जाऊन करू शकता. तसेच घरबसल्या ही अर्ज तुम्हाला करता येतो त्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती अर्ज करू शकता.
विमा नोंदणी साठी अधीकृत वेबसाईट pmfby.gov.in ही आहे.
फळपीक विमा योजना मोबदला कसा मिळतो.
तर शेतकरी मित्रांनो पाऊस कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल तर, पावसात खंड पडला असेल तर , जास्त आद्रता, या सारख्या हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान जास्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोबदला मनून आर्थिक मदत मिळावी मनून फळ पीक विमा योजना महत्वाचे काम करते.
ई पिक पाहणी केली का?
तर शेतकरी बांधवानो तुम्ही ई पिक पाहणी केली नसेल तर तुमचा पीकविम्यासाठी केलेला अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे ई पीक पाहणी करणे फार गरजेचे आहे.
तुम्ही जर पीक विमा साठी सहभाग घेत असाल तर तुम्हाला ई पिक पाहणी ही जुलै ऑगस्ट मध्ये करावी लागणार आहे.
तुम्हांला याच्यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तर आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा नजिकच्या विमा कंपनीला भेट देउ शकता.
फळपीक विमा योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख
प्रत्येक पिकासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वेगवेगळी आहे. तर जाऊन घेऊया अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा.
•लिंबू ,द्राक्ष, पेरू, संत्रा या चार फळ पीकांची अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2025 आहे.
•मोसंबी, चिकू, यासाठी शेवटची तारीख 30 जुन 2025 ही आहे.
•डाळिंब या पिकासाठी तुम्ही 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकता.
• सीताफळ पिकासाठी तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकता.
फळपीक विमा योजना मृग बहार 2025 साठी लागणारी कागदपत्रे
अर्ज करताना लागणारी आवश्यक कागतपत्रे खालीलप्रमाणे
१) agristack नोंदणी क्रमांक (farmer ID )
२) बँक पासबुक
३) सातबारा उतारा
४) Geo tag केलेला पिकाचा फोटो
अशी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला फळपिक विमा योजना यासाठी अर्ज करता येणार नाही.