लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट पैशा जमा होण्यास सुरुवात Ladaki bahin yojana 10th installment
नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी सोल्युशन मध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी 10th installment आधार लिंकिंग खात्या मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून घेऊया पूर्ण माहिती.
महाराष्ट्र सरकारमधील महिला व बालविकास विभाग यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता याचे वितरण 2 मे 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे ही माहिती दिलेली आहे. त्यांनी एक्स आणि फेसबुक या त्यांच्या दोन्ही खात्यांवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी पोस्ट केली आहे.
लाडकी बहीण योजना वेबसाईट -: येथे क्लिक करा
Ladaki bahin yojana 10th installment या विषयी मंत्री अतिदि तटकरे यांची पोस्ट
पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल.
मंत्री आणि तटकरे यांनी दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न खात्यामध्ये पैसे जमा होतील असे आश्वासन दिलेले आहे. 2 मे 2025 या दिवसापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खाते मध्ये पैसे जमा होतील.
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता पाचशे रुपये मिळणार आहेत. आणि इतर सर्व पात्र लाभार्थी महिलांना 1500 एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.