Ration card Kyc सर्व रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी KYC केली नाही तर बंद होणार धान्य
नमस्कार स्वागत आहे तुमचं Marathi Solutions या आपल्या मराठी वेबसाईट वरती तर मित्रानो तुम्हाला रेशन वरील धान्य घेयच असेल तर तुम्हाला Ration Card Kyc करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही kyc केली नाही तर तुमचं धान्य बंद होऊ शकत.

आणी सर्व Ration वरील सुविधा बंद होऊ शकतात.
Ration Card ekyc आवश्यक आहे का?
तर मित्रांनो तुम्हांला अश्या प्रकारचा प्रश्न पडू शकतो. यामागील सरकारचा अशा उद्देश आहे की यामधून जे अपात्र लाभार्थी आहेत ते या मधून वागळता येऊ शकतात. आणी ज्या लोकांना खरंच गरज आहेत त्याना याचा लाभ मिळावा या साठी ration kyc करणे आवश्यक आहे.
Kyc कशी प्रकारे करावी?
तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे kyc करायची कुठे, तर Ration Card Kyc करण्यासाठी तुम्हांला दोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
1) स्वस्त धान्य दुकानदार (रेशन दुकानदार )-: तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे जाऊन kyc करू शकता. Kyc करायला जाताना तुमचे आधार कार्ड जवळ असणे गरजेचे आहे.
2) Mobile App मधून :- हा पर्याय जे लोक सुशिक्षित आहेत ते याचा वापर करू शकतात. कारण तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरूनच Ration Card Kyc करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. आणी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्हाला आधार सेन्टर ला जाऊन लिंक करून यावा लागेल. तरच तुमची kyc होऊ शकते.
तर मित्रांनो जाऊन घेऊया घरबसल्या Ration Card ekyc कशी करावी.
सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये 2 App असणे गरजेचे आहे
1) Mera Kyc
App link : Mera Kyc App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
2) Aadhar Face Rd
App link : Aadhar Face Rd App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे दोन app मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
Mera kyc App ओपन करून घ्या ओपन करून सर्व परवानग्या द्या. तुमच्या मोबाईल चे लोकेशन चालू करून घ्या.
तुमच राज्य या ठिकाणी निवडून घ्या.

त्या नंतर याठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाका आणि generate otp वरती क्लीक करा.

तुमच्या आधारकार्ड ला जो मोबाइल नंबर लिक असेल त्या मोबाइल वरती तुम्हाला 6 अंकी कोड येईल तो त्याठिकाणी टाका आणि खाली दिलेला captcha बरोबर टाका आणि सबमिट करा.

सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सेल्फी कॅमेरा चालू होईल खाली दाखवल्या प्रमाणे चेहरा सर्कल मध्ये घेतल्या नंतर kyc होऊन जाईल.
