जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी Best 5 Shetkari Sarkari Yojana

Shetkari Sarkari Yojana कोणत्या आहेत ज्या पासून शेतकऱ्यांना फायदा होतो. माहिती करून घ्या.

मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी सोलुशन्स मध्ये. तर आपल्या साठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती आहे परंतु शेत मालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरत नाही. आणखीन महत्वाचे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अश्याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासाठी सरकारी योजना 2025 सुरु केल्या आहेत. या लेखामध्ये आज आपण Shetkari Sarkari Yojana कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत.

Shetkari sarkari yojana

केंद्र सरकार आणी राज्य सरकार यांच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांसाठी अनुदान देणाऱ्या योजना या शेतकरी वर्गासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या मधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मागेल त्याला विहीर योजना, पिक विमा योजना, नमो शेतकरी योजना, जैविक शेती योजना अश्या अनेक Shetkari Sarkari Yojana आहेत यांची संपूर्ण माहिति घेणार आहोत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Shetkari Sarkari Yojana जाणून घेऊया पूर्ण माहिती.

 

1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( Pm Kisan )

पंतप्रधान किसान सन्मान योजना हे केंद्र शासनाची योजना आहे.
ही योजना 24 फेब्रुवारी 2019 ला सुरु करण्यात आली. या मधील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत त्याच्या बँक खात्यात दिली जाते. ही रक्कम तीन हफ्यामध्ये दिली जाते.
महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त PM किसान लाभार्थ्यांना दिला जातो. या योजने साठी तुम्ही pm kisan portal अर्ज करू शकता.

2. मागेल त्याला विहीर ( Magel Tyala Vihir )

शेतकरी वर्गासाठी ही एक महत्वाची योजना आहे. कोरडवाहू शेतकऱ्यासाठी ही अनुदानवरील विहीर दिली जाते. या विहिरीना 100% अनुदान दिले जाते विहिरीसाठी 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. या Shetkari Sarkari Yojana साठी तुम्ही ऑनलाईन आणी ऑफलाईन अर्ज करू शकता. ग्रामपंचायत आणी पंचायत समितीतुन करता येतो.

3. मागेल त्याला शेततळे ( Magel Tyala Shettale )

मागेल त्याला शेततळे ज्या शेतकऱ्यांना दीड एकरापेक्षा जास्त शेती आहे अश्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.
शेततळे बांधण्यासाठी 75,000 रुपया पर्यंत अनुदान दिले जाते.
याचा फायदा हा शेती साठी सिंचनाची चांगल्या प्रकारची सोय होते तसेच उत्पनात वाढ होण्यास मदत होते.

4. प्रधानमंत्री पिक विमा योजना ( PMFBY )

प्रधानमंत्री पिक विमा योजना या शेतकरी योजनेची सुरुवात 2016 झाली. प्रीमियम दर हा खरीप 2%, रब्बी 1.5%, फळबाग 5% आहे. याचा लाभ हा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मनुन मदत दिली जाते.

5. मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना यामध्ये सिंचनासाठी शेततळे, विहीर अनुदान, 80% ड्रीप सिंचन अनुदान या सारख्या योजनाचा लाभ मिळतो.
सोलर पंप 90% अनुदावर मिळतो. या साठी अर्ज करण्यासाठी महाडिबीटी या पोर्टल भेट देऊ शकता.

Leave a Comment