लाडक्या बहिणींसाठी solar cooker scheme

Solar Cooker Scheme In Marathi

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची योजना जानेवारी 2025 मध्ये सुरु करण्यात आली आहे. तर मित्रांनो ती योजना म्हणजे solar cooker scheme होय. सूर्यचूल ही योजना लाडक्या बहिणींसाठी वरदान ठरणारी योजना आहे. कारण तुम्ही रोज स्वयंपाक करण्यासाठी होणारा गॅस किंवा वीज बिलाचा खर्च होणार नाही.तसेच धुरामध्ये डोळे दुखवत बसायची गरज राहणार नाही. Solar cooker scheme म्हणजे सूर्यचूल होय. तर मित्रांनो सूर्यचूल म्हणजे काय? सूर्यचूल ही एक आत्याधुनिक स्वयंपाक करण्याची चुल होय. ही चूल सौर ऊर्जेच्या उष्णतेवर स्वयंपाक करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा सूर्यचूल विकत घेतली कि त्याला नंतर खर्च कुठल्याही प्रकारचा नाही.

solar cooker scheme in marathi
Solar Cooker Scheme In Marathi

 

Solar Cooker Scheme वर कोण कोणता स्वयंपाक करू शकतो?

तर लाडक्या बहिणी या सूर्यचूल वरती चपाती, भाकरी, भाजी, बिर्याणी, पराठे, असे विविध प्रकारचे अन्न या वरती शिजवू शकतो. त्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज,व्हेज बनवू शकता. रोजच्या चुलीवरती किंवा गॅस वरती जो स्वयंपाक करतात तो तो सर्व सूर्य चुलीवर करू शकता.

Solar Cooker Scheme साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Solar Cooker Scheme ची माहिती साठी वेबसाइट ची लिंक. https://iocl.com/IndoorSolarCookingSystem

Solar cooker scheme मध्ये 3 प्रकारचे कुकर

तर या मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे सोलार चुली पाहायला मिळणार आहेत. तुम्ही ज्या प्रकारची सोलर चूल पाहिजे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही solar cooker scheme अर्ज करताना चांगल्या प्रकारे पाहूनच अर्ज करा.

1.डबल बर्नर सोलर कुकर
• यामधील दोन्ही बर्नर हे सौर उर्जेवर काम करतात.
• जर सौर ऊर्जा नसेल तर विजेचा पर्याय उपलब्ध आहे.
• ही सोलर चूल ही मोठ्या कुटुंबासाठी योग्य आहे.

2. डबल बर्नर हायब्रीड कुकर
• याध्ये दोन बर्नर आहेत.
• एक scheme hहा सोलर आणि विद्युत वरती चालणार आहे.
• दुसरा बर्नर हा केवळ सोलार वरती चालतो.

3. सिंगल बर्नर सोलर कुकर
• या कुकरमध्ये तुम्हाला एकच बर्नर मिळेल.
• हा बर्नर सोलर आणि विद्युत दोन्हीवरही चालतो.
• हा कुकर लहान कुटुंबासाठी फायदेशीर असणार आहे.

तर तुम्हालाही solar cooker scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

• तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव
• त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा वैद्य ईमेल आयडी लागणार आहे.
• तसे तुमच्याकडे एक चालू मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
• त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य आणि जिल्हा त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे.
• या ठिकाणी तुम्हाला कुटुंबातील सदस्य संख्या विचारली जाते.
• तुम्ही एका वर्षामध्ये किती गॅस सिलेंडर वापरतात ते तिथे विचारले जाते.
• तुमच्याकडे सोलर पॅनल साठी उपलब्ध जागा आहे का नाही हे विचारले जाते.
• त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची सोलार चूल पाहिजे आहे ते विचारले जाते.

तर या योजनेसाठी पात्रता निकष कोणते आहे ते आपण जाणून घेऊया.

• त्यासाठी तुमच्या घराच्या छतावर किमान 2×2 मीटर जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
• ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
• अर्जदार ही महिला असणे प्राधान्याने आवश्यक.

तर solar cooker scheme अंतर्गत मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात येणार आहे.
• त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष किंमत या सोलर चूलची 15 ते 20 हजार असणार आहे.
• या योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त 1500 ते 2000 रुपये भरावे लागणार आहेत.

फायदे आणि उपयोगिता

1.आर्थिक फायदे-: यामधील सर्वात मोठा म्हणजेच आर्थिक फायदा होणार आहे, सोलार कुकर विकत घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा खर्च नाही.

2. पर्यावरणीय फायदे-: पर्यावरणीय फायदे म्हणजे तुम्हाला चूल पेटवण्यासाठी लाकडे तोडण्याची गरज पडणार नाही त्यामुळं याचा पर्यावरणीय फायदा होणार आहे. तसेच प्रदूषण ही नियंत्रित होणार आहे.

3.सामाजिक फायदे-: यामुळे महिलांना सक्षमीकरण मिळणार आहे. स्वयंपाक घरातील कामाचे सुलभीकरण होण्यास मदत होईल. आरोग्यदायी स्वयंपाक पद्धती मिळणार आहे.

तुमच्यासाठी खास महत्त्वाची सूचना

• solar cooker scheme साठी अर्ज भरण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
• तुमच्या छतावरती योग्य जागा आहे का ते तपासून पहा.
• तुम्हाला हवे असणाऱ्या योग्य मॉडेलचीच निवड करा.
• अर्ज भरताना कुठलीही चूक करू नका.
• संपर्क क्रमांक आणि पत्ता बरोबर टाकून घ्या.

Conclusion

तर मित्रांनो मी आशा करतो की,दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. Solar cooker scheme हा लेख शेअर करा म्हणजे कोणत्या कोणत्या बहिणीला याचा फायदा होईल. काही अडचण आल्यास comment मध्ये सांगा……धन्यवाद

FAQS

1) सौर कुकर चांगला की वाईट?

उत्तर. solar cooker हा उघड्यावर जाळ येत नाही त्यामुळं  तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. हळू हळू गरम होत असल्यामुळे अन्न जळत नाही.

2) सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी काय वापरतात?

उत्तर. यामध्ये सूर्यप्रकाश भांडी गरम करतो  ते अन्न त्या पासून शिजवले जते.यामध्ये आरशे वापरले जातात त्यामुळं सर्व सूर्यप्रकाश एकत्र करून उष्णता निर्माण करतात.

Leave a Comment