Sudharit pik vima yojana नवीन जि-आर आला 1 रुपयातील विमा बंद

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.कारण आता 1 रुपयामध्ये विमा मिळणार नाही,1 रुपयात मिळणारा विमा बंद करण्यात आला आहे.

Sudharit pik vima yojana

शेतकरी बांधवांनो सर्वसामावेश पिक विमा योजनेत आता बदल करण्यात आलेला आहे. आणी आता सुधारित पीकविमा योजना आता राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मध्ये 2023 पासून 1 रुपयामध्ये सर्वसामावेश पिक विमा योजना सुरु करण्यात आली होती परंतु याचा गैरफायदा घेण्यात येत होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यामध्ये बदल करण्याचे ठरवले होते. आता या योजनेतील बदलाचा नवीन GR सरकारने निर्गमित केला आहे.

Sudharit pik vima yojana शासन निर्णय जाणून घेऊया.

• खरीब हंगाम 2025-26 पासून राज्यामध्ये सर्वसामावेश पिक विमा योजना यामध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीपसाठी 2% रब्बीसाठी 1.5% तसेच नगदी पिकांकरिता 5% शेतकरी हिस्सा घेऊन आणी राहिलेला पिक हफ्ता राज्य शासन आणी केंद्र शासन मार्फत देऊन पिक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पिक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत नाही.

• रब्बी आणी खरीप यांकरिता खालील बाबींचा यामध्ये विचार केला जाणार आहे.

पिक पेरल्यापासून ते काढण्यापर्यंत यांमध्ये विज कोसळली तर, गारपीट,वादळ, चक्रीवादळमुळे लागलेली आग,पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.

• तसेच सुधारित पिक विमा योजना ही खरीप 2025 पासून ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामा करिता cup and Cup model नुसार राबविण्यात येणार आहे.

• संपूर्ण GR ची लिंक खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करून पूर्ण सविस्तर जी-आर वाचून माहिती घेऊ शकता.

Sudharit pik vima yojana जी-आर लिंक 

सुधारित पिक विमा योजना -: येथे क्लिक करा

Leave a Comment